पायाभूत सुविधा अनुदान योजनेंतर्गत अल्पसंख्यांक शाळांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन - kalayog

५ जुलै, २०२२

पायाभूत सुविधा अनुदान योजनेंतर्गत अल्पसंख्यांक शाळांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 


    उस्मानाबाद,दि.5: राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित विना अनुदानितकायम विना अनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका नगरपरिषद शाळा आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहेया योजनेंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानाकरिता शिफारस करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी केले आहे 

          अनुदानाकरिता शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.अल्पसंख्यांक विकास विभागाकडील शासन निर्णयातील विहीत निकषांनुसार ही योजना 2022-23 या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात येणार आहेत्यानुषंगाने या योजनेंतर्गत अनुदान मिळू इच्छिणा-या उस्मानाबाद जिल्हयातील अल्पसंख्यांक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रस्ताव सादर करावेत.त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरण योजनेसाठीही अर्ज करावयाचे आहेत.

प्राप्त प्रस्तावांची छाननी आणि त्रुटींची पूर्तता करून अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील.उपरोक्त प्रमाणे नेमूण दिलेल्या वेळापत्रकानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुदान मिळू इच्छिणा-या अल्पसंख्यांक शाळांनी त्यांचे प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करावेतविहीत मुदतीनंतर प्राप्त होणार प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत याबाबत नोंद घ्यावी.असेही आवाहन श्री.झाडे यांनी केले आहे.