आशिष झाडके यांनी पटकावले राज्यस्तरीय पारितोषिक - kalayog

३० जुलै, २०२२

आशिष झाडके यांनी पटकावले राज्यस्तरीय पारितोषिक


कळंब, प्रतिनिधी‌‌:- बीड जिल्ह्यातील केज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत कळंब येथील फ्युजन डान्स,ड्रामा,योगा स्टुडिओ चे संचालक अशिष निवृर्ती झाडके यांनी खुल्या गटात प्रथम पारितोषिक पटकावले.
          या स्पर्धेत एकूण 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मुंबई,पुणे,कोल्हापूर,नाशिक,सांगली ,संभाजी नगर,धाराशिव ,लातूर ,बीड ,अंबाजोगाई,परळी आदी ठिकाणाहून स्पर्धक मोठ्या संख्यने स्पर्धेत सहभागी झाले होते.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.