भोगजी शाळेत प्रवेशोत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमानी साजरा - kalayog

१६ जून, २०२२

भोगजी शाळेत प्रवेशोत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमानी साजरा


 
  दि. 15 जून रोजी जि प प्रा शा भोगजी शाळेत बालिकांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला सर्व प्रथम गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, संत तुकाराम,हनुमान, गणपती, वारकरी, टाळकरी अशा विविध वेशभूषा करुन पालकी मध्ये पुस्तकांची दिंडीत मिरवणूक काढण्यात आली. वाटेत मातांनी बाल विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा केली. 
प्रवेश दिंडी मध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते, टाळांचा आवाज, विठोबा माऊली चा गजर याने गाव परीसर दुमदुमला. विद्यार्थ्यांनी माऊली माऊली गाण्यावर ताल धरला यात अबाल वृध्द सहभागी झाले होते सर्व गावात भक्तीमय वातावरण बनले होते. शेवटी पहीलीत दाखल बालकांचे पुष्प व पुस्तके देवून स्वागत करण्यात आले ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक चौधरी सर, गव्हाणे सर भोसले सर उबाळे सर मुंडे सर शरद आडसूळ तरुण मंडळी व ग्रामस्थ यांनी परीश्रम घेतले.