जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट - kalayog

५ सप्टेंबर, २०२१

जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट


उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र  गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतातील उसाचे पीक भुई सपाट झाले आहे त्याचबरोबर जनावरांच्या कडबा शेंद्री चे पिक देखील भुईसपाट झाले आहे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे सोयाबीन चे पीक पिवळे पडत चालले आहे गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे फुल गळ होऊन उत्पन्नात अगोदरच घट झालेली आहे त्यात आता अतिवृष्टीने राहिलेल्या सोयाबीन ची नुकसान होताना दिसून येत आहे