निदेशकांच्या माहितीस विलंब झाल्यास संबंधित राहणार जबाबदार.
मुंबई - महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या दिनांक ६ नोहेंबर २०२० चा पत्रानुसार कला,क्रीडा,कार्यानुभव,निदेशकांची माहिती २० नोहेंबार पूर्वी विना विलंब मागवली आहे.माहिती देण्यास विलंब झाल्यास निर्माण झालेल्या बाबींना संबंधितांना जबाबदार धरले जाईल असे सांगितले आहे.
शासनाच्या परिपत्रक जा क्र मप्राशिप / सशि/अं.नि./२०२०-२१/२२९१ नुसार स.न.२०११-१२ ते स.न.२०१८-१९ या कालावधीत १०० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक /अतिथी निदेशक म्हणून सेवा बजावलेल्या निदेशकांची यादी* तयार करून त्याची माहिती विनाविलंब सादर करण्याविषयी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी राज्यातील सर्व जि.प.शिक्षणाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाधिकारी यांना परिपत्रक काढले असून बऱ्याच ठिकाणाहून अद्याप याबाबत पाठपुरावा झाले नसल्याचे दिसून आहे.पूर्वीचे मुख्याध्यापक बदलून गेल्यामुळे बऱ्याच नवीन मुख्याध्यापकांना याबाबत माहिती नसल्याची बाब समोर येत आहे त्यांनी आपल्या शाळेवर निदेशकानी काम केले आहे याची खात्री करून त्यांची माहिती पाठवणे गरजेचे आहे.बऱ्याच शाळांना विचारणा केली असता आमच्याकडे असे पत्र आले नसल्याचे सांगितले आहे.यामुळे समन्वयाचा अभाव दिसून येतो.निष्काळजीपणामुळे त्या शाळेतील निदेशकांची माहिती कार्यालयास वेळेत नाही पोहोचल्यास अनेक प्रश्न निर्माण होवू शकतात अशी चर्चा आहे