- kalayog

६ नोव्हेंबर, २०१९

जिव्हाळा ग्रुपचा दुसरा स्नेह मेळावा उत्साहात

 . कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सन. 2000 ते 2005 वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या " जिव्हाळा परिवाराचा " दुसऱ्या वर्षिचा स्नेह मेळावा साई मंगल कार्यालयात उत्साही वातावरणात पार पडला.
जिव्हाळा परिवाराच्या दुसऱ्या वर्षिच्या स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य पंडीत शिंदे तर प्रमुख पाहुणे प्रा. संजय घुले, डाँक्टर रमेश जाधवर, अतुल गायकवाड, प्रा. डाँ. विद्युलता पवार ( मिटकरी) यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे व  गणेशाच्या मुर्तीचे पुजन करूण उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सन. 2000 ते 2005 सालातील माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन  जिवनातील आठवणींना पि.पि.टीच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला. तसेच जिव्हाळा परिवारच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजुत रक्तदान शिबीरा सोळा सदस्यांनी रक्तदान केले . तसेच कलायोग शिबीरातील जवळपास 250 शिबीरार्थिंना अल्पोहार, आर्थिक द् ष्ट्या कमकुवत असलेल्या प्रांजली कांबळे या विद्यार्थिनीला वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत, महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वक्ष लागवडीच्या " एक विद्यार्थी एक झाड उपक्रमात सहभाग , जि.प.शाळा आंदोराच्या विदयार्थ्यांसाठी इको माईक भेट,     तसेच शेतकऱ्यांसाठी आंदोरा येथील स्वामी विवेकानंद वाचनालयास शेती उपयोगी पुस्तके भेट देवून परिवारातील सदस्यांचा वाढदिवस केकविरहीत व देशी वृक्ष देवून साजरा केला जातो. तसेच सत्यमेव जयते वाँटरकप स्पर्धेमध्ये पाणी फाउंडेशनच्या "मन संधारणाबरोबरच जलसंधारणात"  सहभाग घेवून वर्षभर सामाजीक उपक् म राबवून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
यावेळी माजी विद्यार्थिनी अँड. मनिषा पाटील,  पल्लवी कवडे, भाग्यश्री मुंडे, रेश्मा तुपसैंदर्य, सोनाली मुळीक, प्रा. डॉ. मनिषा जाधव,  निलीमा काटे, प्रा. विनोद पवार, बालाजी मोरे,अनंत इंगळे, चंद्रकांत डोईफोडे आदींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रमुख पाहुणे व जिव्हाळा परिवाराच्या सदस्यांना षुष्पगुच्छ व सन्मान चिंन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक परमेश्वर मोरे यांनी केले. सुत्रसंचलन विकास वाघमारे तर आभार मदन तांबारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुजंग लोकरे, शरद आडसुळ, शैलेश शिंदे, दगडू झोंबाडे, बालाजी देसाई, बालाजी शेळके, कमलाकर इंगळे आदींनी परिश्रम घेतले.