गुरूपौर्णिमा - kalayog

८ जुलै, २०१७

गुरूपौर्णिमा

आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.

चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूची पूजा केली पाहिजे.