उस्मानाबाद :- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध,मनाई,निवारण अधिनियम 2013 पासून लागु करण्यात आला आहे.या अंतर्गत सर्व कार्यालयांनी महिला तक्रार निवारण समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
या अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या अस्थापनेमध्ये,कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी,कर्मचारी यांचा समावेश असेल, अशा प्रत्येक अस्थापना,कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य आहे.ज्या कार्यालयामध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील त्यांनी स्थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करता यईल.
या अधिनियमातील कलम 4(1) नुसार प्रत्येक शासकीय,निमशासकीय कार्यालय, संघटना, महामंडळे,आस्थापना,संस्था,शाखा ज्याची शासनाने स्थापना केली असेल किंवा पूर्ण किंवा अंशताः,प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरणामार्फत किंवा शासकीय कंपनी किंवा खाजगी उपक्रम, संस्था,इंटरप्रायजेस,अशासकीय संघटना,सोसायटी,ट्रस्ट,उत्पादक,
अधिकारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद यांना दि.12 एप्रिल 2021 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व बी.एच. निपाणीकर,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उस्मानाबाद यानी केले आहे.