छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'हिंदी दिवस' समारोह संपन्न - kalayog

१५ सप्टेंबर, २०२३

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'हिंदी दिवस' समारोह संपन्न

 कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शुक्रवार दि.15/09/ 2023 रोजी 14 सितंबर'हिंदी दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष प्रा.ज्योतीराम जाधव,प्रमुख मार्गदर्शक प्रा.शफीक चौधरी तसेच प्रमुख उपस्थितीत प्रा.नामदेव तोडकर हे होते.कार्यक्रमाची सुरवात प्रथमतः छ.शिवाजी महाराज,महात्मा गांधी व कै.नससिंग(अण्णा) जाधव यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा.नामदेव तोडकर यानी हिंदी भाषेचा उदभव आणि विकास या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, प्रा.शफीक चौधरी यानी राजभाषा,राष्ट्रभाषा व संपर्कभाषा में हिंदी का योगदान या विषया वर सखोल मार्गदर्शन केले.  अध्यक्षीय समारोप प्रा.ज्योतीराम जाधव यानी केला.सुत्रसंचालन  प्रा.अभिमान ढाणे यानी केले.आभार डॉ.संदिप हांडीबाग यांनी मानले.या वेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.